Tuesday, October 30, 2018

❣ *प्रेम - एक वादळ*❣

❣ *प्रेम - एक वादळ*❣
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

*भाग*- *4*

          सुहास आणि काव्या दोघेही खुप खुश होते. दोघे एकमेंकासाठी वेळ देत होते. Made for each other म्हणायला काही हरकत नाही. दोघे जरी एकमेंकावर प्रेम करत असले तरी अभ्यासतही तेवढेच हुशार होते. तसं म्हणायला गेलं तर दोघांनीही ठरवलं होतं जेवढा वेळ आपण आपल्यासाठी देऊ तेवढाच वेळ आपण इतरांसाठी ही द्यायचा. कॉलेजला गेल्यावर तु तुझ्या मित्रांमध्ये आणि मी माझ्या मित्रांमध्ये असे दोघांनीही एकमेंकाना समजावलं होत.
          त्याच झालं अस, काव्याचा खास मित्र म्हणण्यापेक्षा अगदी भाऊच तिचा. अभिषेक नाव होत त्याचं. सगळे लाडाने अभि बोलायचे त्याला. खुप जवळचा होता तिचा. अगदी सख्खा भाऊ तसाच तोही. खुप frankly आणि समंजस होता. सुहास आणि त्याची जास्त ओळख नव्हती. तसं म्हणायला गेलं तर सुहास अभि वर जळत होता. कारण ही तसचं होत. अभि उठता बसता सारखा काव्याचा जवळ असायचा. सुहास ला ते पटत नसायचं. पण जेव्हा काव्याने सुहास आणि अभि ची ओळख करुन दिली तेव्हापासुन दोघंही एकमेंकाचे खास झाले होते. आता मात्र सुहासला काहीच problem नव्हता. कारण त्याला माहितं होतं जरी सुहास काव्याच्या जवळ नसला तरी तिची काळजी घेणारा तिचा भाऊ अभि आहेच. तेव्हापासुन सुहासने  कधीच आभि आणि काव्याबद्दल मतभेद केला नाही. पण अचानक अभि सुहासजवळ बोलायचा बंद झाला. कारण काय हे कुणालाच ठाऊक नव्हतं. अगदी सुहासला सुध्दा कळत नव्हत. सुहास अभिला सारखा विचारायचा, " *अभि काय झालं? बोलायचा बंद का झालास? माझं काही चुकलं का?*" पण अभि त्याकडे दुर्लक्ष करत होता. एवढं होऊन सुध्दा सुहास काव्याला कधीच बोलला नाही की, काव्या अभिसोबत राहु नको म्हणुन.  उलट सुहास बोलायचा तिला, " *काव्या माझ्याशी नाही बोल्लीस तरी चालेल पण एका चांगल्या मित्राला गमवू नको.*"
          काव्याला सगळं पटत होत. काव्या होतीच तशी समजुतदार. हळुहळु नंतर अभि सुहास जवळ बोलायला लागला. " *सुहास माफ करं. पण मलाच माहीत नाही मला कायं झालं. कसला माज आला होता माहित नाही.*" अभि खजिल होऊन बोलत होता. " *असुदे रे, तुला चुक कळली ना बास! जाऊदे सोड. मला राग नाही त्याचा*" सुहास अभिला जवळ करुन बोलला. आता मात्र दोघेही खुश होते. हे सगळ बघुन काव्याला खुप बरं वाटतं होतं. कारण ही तसच होतं. एक चांगला मित्र होता आणि एक चांगला bf होता. दिवस मस्त चालले होते. जसा सुहास काव्याच्या सोबत होता तशी काव्यासुद्धा सुहासच्या सोबत साथ देत होती.
           एके दिवशी सुहास काव्याला भेटायला गेला होता. दोघेही मस्त बोलत बसले होते. पण अचानक सुहासच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुहास काव्याच्या मांडीवर डोके ठेवुन रडायला लागला. काव्याला काय करु सुचतं नव्हतं. " *अरे वेड्या, रडतोस काय? काय झालं सांग ना रे?*" काव्याला काहीच समजतं नव्हतं. सुहास पहिल्यांदा कुणासमोर तरी एवाढा रडत होता. " *काव्या, मी तुला खुप त्रास देतो ना गं? पण खरचं मुद्दाम नाही गं करतं*" सुहास हुंदके देत रडत होता. " *अरे मी बोलले का त्रास देतोस ते? तु माझ्यासाठी करतोस रे. असं नको ना रे बोलु.*" काव्याच्या डोळ्यात पाणी आलं होत. काव्या सुहासला शांत करत होती. रोज हसवणारा, रोज रागवणारा, रोज बडबड करणारा सुहास आज रडवेला बघुन काव्याला वाईट वाटलं होतं. नंतर दोघेही शांत झाले आणि बस मधुन निघुन गेले.
           जसा सुहास काव्याच्या नाराजी दुर होण्याचा कारण बनत होता तसचं हळुहळु काव्या सुद्धा सुहासच्या नाराजी दुर होण्याची कारण बनत होती. सुहास जेवढं सुख-दुःख कुणाला सांगत नव्हता तेवढं तो काव्याजवळ share करत होता.पुर्ण कॉलेजमध्ये दोघेही famous झाले होते. जवळ जवळ दीड वर्ष त्याचं relation कॉलेजमध्ये कुणालाच  माहित नव्हत. तसे ते दोघे वागत होते. कॉलेजमध्ये जाताना दोघेही ठरवायचे, तु तुझ्या मित्रांमध्ये राहायचा आणि मी माझ्यां मित्रांमध्ये. तेवढचं study कडे ही लक्ष द्यायचं. पण नंतर हळुहळु कॉलेजमध्ये त्या दोघांच्या नात्याबद्दल समजलं. शेवटी सगळे आश्चर्यचकित झाले होते. कारण एकाच कॉलेजमध्ये असुन दीड वर्ष relation लपुन ठेवणे हे त्या दोघांनीच केलं होतं. काव्यामुळे सुहासचा बराचसा राग कमी झाला होता. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकला होता. तसं म्हणायला गेलं तर सुहासला कधी कसलीच भीती वाटत नसायची कारण त्याच्यासोबत साथ देणारी काव्या असायची......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*क्रमशः*

❣ *प्रेम - एक वादळ*❣

❣ *प्रेम - एक वादळ*❣
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

*भाग*- *३*

          अचानक मोबाईल वर मेसेज आल्याचा आवाज आला. काव्याचा मेसेज होता तो. सुहासने पटकन मोबाईल हातात घेतला आणि मेसेज openकेला. *"सुहास माफ करं मला, पण ते शक्य नाही. माझ्या आयुष्यात आधीच कोण तरी आहे.*" काव्या पटकन बोलुन गेली. सुहास थोडा नाराज झाला होता. पण त्याने नाराजी काव्याला दाखवली नव्हती. नंतर नेहमीप्रमाणे त्याचं बोलनं सुरु राहिलं.
          दुसर्या दिवसापासुन सुहास काव्याला भेटण्याचं टाळत होता. पण काय करणार! त्याला तसही राहावत नव्हत म्हणुन तो गुपचुप तिला लांबून बघत राहायचा. हळुहळु दिवस सरत होते. पण काव्या मात्र त्याला नेहमी प्रमाणे नकार देत होती. नंतर सुहासने मनाशी पक्क ठरवलं होतं, आता एक दिवस आपण असा आणायचा की, हीच काव्या आपल्या स्वतःहुन प्रेमात पडेल. आणि तो दिवस शेवटी आलाच.
          एके दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला दोघेही आले. नेहमीप्रमाणे lectures वैगेरे चालु होते. पण आज काव्या जरा उदास होती. सुहासच्या ते लक्षात आलं होत. त्याने खुप तिला विचारायचा प्रयत्न केला. पण काव्याने त्याला सांगितले नाही. शेवटी न राहुन सुहास बोलला, " *काव्या तुझा bf नसलो म्हणुन काय झालं, एक चांगला मित्र तर आहेच ना? काय problem आहे तो सांग. मी काहीतरी मदत करेन.*" शेवटी न राहुन काव्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि रडायला लागली. सुहासला बघवतं नव्हतं ते. काव्याला रडताना पहिल्यांदा बघितलं होत त्याने. तिला धीर देत होता. " *सुहास तुला कसं सांगु रे, माझं आणि त्याचं आता पटत नाही रे. खुप त्रास देतोय मला तो.*" काव्या रडवेल्या स्वरात बोलत होती. सुहासला हे सगळं ऐकुन शॉक बसला होता.
          सुहासने काव्याला धीर द्यायचा प्रयत्न केला. " *कंटाळा आलाय रे मला आता जगण्याचा. काय करु रे मी?*" काव्या पुर्णपणे हतबल झाली होती. सुहासला सगळं ऐकुन काय करु सुचतं नव्हतं. " *काव्या घाबरु नको, मी आहे ना सोबत. मी करतो काय तरी, पण अशी हताश होऊ नको.*" सुहास बोलतच होता. " *अशी जीवनाला कंटाळु नको. आपण काय तरी मार्ग काढु.*" सुहास इता तिला चांगला धीर देत होता. काव्याला आता थोडं बरं वाटत होत. सुहासने बोलल्याप्रमाणे 7-8 दिवसांत काव्याला तिच्या problem मधुन पुर्णपणे बाहेर काढलं होत. आता काव्या व्यवस्थित वाटत होती. आनंदी झाली होती.
           असचं एके दिवशी सुहास आणि काव्या कॉलेजच्या खिडकीमध्ये बोलत उभे होते. " *सुहास खरचं तेव्हा तु नसतास माझं काय झालं असतं*" काव्या त्याच्याकडे बघुन बोलत होती. " *मी तर तुला नकार दिला होता, तरी तु माझी साथ सोडली नाहीस. असं का सुहास.*" सुहास आता थोडा भावानिक झाला होता. " *काव्या तु नाही बोललीस त्याचा राग नव्हता मला. मी जर तुझ्यावर प्रेम करत होतो ना मग बसं झालं आणि साथ द्यायच बोललीस तर तु तेव्हा एकटी पडली होतीस पण माझ्याशी share केलसं तु मला खुप होत ते.*" सुहास बोलतच होता आणि काव्या त्याच्याकडे बघतच राहिली. " *तु माझ्यावर प्रेम करतेस की नाही हा विचार नाही केला मी, तुला आज आधाराची गरज आहे आणि ते माझ्यामुळे शक्य होत असेल तर मला आनंद आहे. कारण प्रेम करुन नुसतं होत नाही. तु एक मुलगी आहेस त्यापेक्षा तु कुणाची तरी एक मुलगी किंवा बहिण आहेस हे जास्त महत्वाचं होत तेव्हा माझ्यासाठी.*" सुहास समजूतदारपणे बोलत होता. आज सुहासच्या बोलण्यात वेगळीच चमक होती. काव्याच आज लक्ष फक्त सुहासकडे होतं.
           आज खर्या अर्थाने सुहास बोलत होता. अक्षम्य आणि अगण्य असे भाष्य. काव्या तेव्हापासुन सुहासच्या प्रेमातच पडली होती. अस म्हणतात की, प्रेम मुद्दाम मागुन मिळत नाही तर ते व्हायला फक्त एक क्षण बाकी असतो. तोच हा क्षण. त्या दिवशी काव्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.सुहास भलताच आनंदी झाला होता. त्याला आता हे विश्वच सुंदर दिसायला लागलं होतं. इकडे मात्र classroom मधली मुलं मुली बाहेर गेली तरी ते दोघे मात्र बोलतच होते. आनंदाचा क्षण होता ना शेवटी तो दोघांसाठी......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*क्रमशः*

❣ *प्रेम - एक वादळ*❣

❣ *प्रेम - एक वादळ*❣
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

*भाग* - *२*
         
          काव्या जरी त्याला मित्र  समजत असली तरी सुहास सोबत खुप खुश असायची ती. जणु काही तो तिच्यासाठी बनला असावा. मात्र सुहास हा दिवसेंदिवस काव्याच्या प्रेमात पडत होता. जेव्हा जेव्हा काव्या नाराज असायची तेव्हा तेव्हा हाच सुहास तिची नाराजी दुर होण्याची कारण बनत होता.
          पण तस म्हणायला गेलं तर सुहास आणि काव्या ची ओळख होण्यामागे खरा हात होता प्रमोद चा. प्रमोद हा सुहासच्या आयुष्यातला कॉलेजमधला पहिला खास मित्र. सुहास सगळ काही त्याचाही Share करायचा. काव्या ही प्रमोद ची शाळेपासुनची  मैत्रीण होती. पण कॉलेजला आल्यापासुन काव्या आणि प्रमोद ची जास्त भेट होत नसे. पण काव्याला माहित नव्हत की सुहास हा प्रमोद चा मित्र असेल.
          एक दिवस प्रमोद आणि सुहास काही कामानिमित्त बस स्टँन्ड वर आले.काव्याचे कॉलेज तिथेच जवळ असल्यामुळे तिही त्याच बस स्टॕन्ड वर रोज येत असे. तेव्हा तिथे काव्या सुद्धा आली होती. झालं!तिथेच सुहास आणि काव्याची पहिली भेट झाली. " *देखा जो तुझे यार दिल मैं बजी गितार* " तसच काहीस सुहासच्या बाबतीत झाल होत.मुलींपासुन लांब राहणारा सुहास काव्याला बघितल्यापासुन पुर्णपणे वेडा झाला होता. त्याने काव्याला बघीतलं आणि सुहास तिच्या प्रेमात पडला. पण तो हे सांगायला तिला घाबरत होता. त्याने प्रमोदच्या मदतीने काव्या जवळ ओळख करुन घेतली होती. मग मी उल्लेख केल्याप्रमाणे फेसबुक वर *सुहास* आणि *काव्या* ची मैत्री झाली.
          सुहास जरी काव्याच्या प्रेमात पडला असला तरी काव्या या पासुन पुर्ण वेगळी होती. काव्याच्या आयुष्यात आधीपासुन तिचा *BF* होता. पण या सगळ्याची सुहास ला कल्पना होती. तुर्तास थोडा कोलमडुन गेला होता. पहिला लाजाळु सुहास आणि आताचा सुहास यांत भरपुर बदल झाला होता. सुहास कविता ही करायला शिकला होता. पण आता त्याच्या प्रत्येक शब्दांमध्ये काव्याच दिसत होती. सुहासने काव्यासाठी छान अशी कविता केली होती.
          इकडे काव्या मात्र तिच्याच विश्वात रमत होती. तिला जरा सुद्धा कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यात सुहास नावाच वादळ येणार आहे.एके दिवशी सुहासने ठरवले, आज काव्याला सगळ खरं सांगुन टाकायचा. ठरल्याप्रमाणे दोघेही रात्री अॉनलाइन आले. रोजच्या प्रमाणे बोलनं चालु झाल खर पण आज सुहास ची चांगली तारांबळ उडाली होती. आज सगळं खर सांगणार होता ना तिला......
" *काव्या ऐक ना ग! मी ना एक कविता तयार केलेय!* सुहास हलक्या आवाजात तिला म्हणाला. " *जिच्यावर प्रेम करायला लागलोय ना तिच्यासाठी*" सुहास पटकन बोलुन गेला. " *अरे! वेड्या दाखव ना मग तिला, आवडेल तिला*" काव्या अनपेक्षितपणे बोलली. आता मात्र काय बोलु? याचा विचार सुहासला पडला होता. " *काव्या खरं सागायचं म्हणलं तर ती कविता तुझ्यासाठीच आहे, माझं तुझ्यावर प्रेम बसलयं* " न राहुन सुहास लाजत लाजत बोलुन गेला. 5 - 10 मिनीट झाली तरी काव्याचा एकही reply आला नव्हता. सुहासला आता काहीच सुचत नव्हत. बिचारा हिरमसुन गेला होता. काव्याला आपण दुखावलं की काय याची टोचण मनाला टोचत राहिली. घामाने ओलाचिंब झाला होता तो.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*क्रमशः*

❣ *प्रेम - एक वादळ*❣

❣ *प्रेम - एक वादळ* ❣
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

          *आजकाल जिकडे तिकडे प्रेमाची वादळे वाहत आहेत. अशाच एका वादळाची ही कथा*.
          *सुहास* नुकताच घरी पडुन आराम करत होता. तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. मेसेज आला होता तिचा. तिच ती त्याचा आयुष्यातली अर्धांगिनी. तिच खरं नाव वेगळ होत पण तो तिला आवडीने *काव्या* बोलत असे. त्याच्या कवितांच्या समुद्रामध्ये बुडुन जाणारी *काव्या*.
         " *सुहास* लवकर इकडे ये , *सुजाता* ला चक्कर आली तिला उभं रहाता येत नाहीये " असा मेसेज बघताच क्षणाचाही विलंब न करता *सुहास* गाडी घेऊन निघुन गेला. *सुजाता* ही *काव्याची* कॉलेजची मैत्रीण. *काव्या* *सुजाता* ला धीर देत सावरत होती. तितक्यात *सुहास* गाडी घेऊन तिथे पोहोचला. त्याने लगेच *सुजाता* गाडी वर बसवलं आणि तिला तिच्या घरी सोडलं. इकडे काव्या घरी जाण्यासाठी बस पकडत होती तितक्यात सुहास तिथे हजर झाला. " *अरे परत कशाला आलास*. *मी गेले असते बस ने*. *तुझी किती धावपळ झाली*. काळजीच्या स्वरात *काव्या* बोलत होती. पण ऐकेल तर तो *सुहास* कसला. " *असुदे गं*! *तुझ्या मुळे मला कधी त्रास झालायं का*? मिश्किलपणे  बघत *सुहास* बोलत होता. दोघेही एकमेंकाकडे बघुन हसले आणि  गाडीवर बसुन निघुन गेले.
          *सुहास* आणि *काव्या* ची ओळख झाली तशी वेगळीच. अकरावी संपुन आता यशाच्या शिखराकडे जाण्याची वेळ म्हणजेच बारावी. बारावी सुरु झाली. तरुण मुलं म्हंटल्यावर इंटरनेट हे आलचं. *सुहास* ही ह्या गोष्टीला अपवादात्मक होता. त्याने ही फेसबुक वर स्वतःचे अकाऊंट उघडले. तिथे च त्याला काव्याचे अकाऊंट दिसले. लगेच त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली.2-3 दिवसांनी *काव्याने* त्याची रिक्वेस्ट मंजुर केली.
          रिक्वेस्ट मंजुर झाल्यावर दोघांमधील संभाषण हळुहळु वाढत गेलं. तस बघायला गेल असता मुलींजवळ बोलण्याची ही *सुहास* ची पहिलीच वेळ. मुळातचं  लहानपणापासुन लाजाळु. आणि त्यात *काव्याशी* ओळख झाल्यापासुन त्याच लाजुन लाजुन नकोस झालं होत. हळुहळु ओळख वाढत गेली. सुहास पुर्ण *काव्याच्या* दुनियेत रमुन गेला होता. पण ह्या सगळ्याची जरा सुद्धा कल्पना *काव्याला* नव्हती. काव्या मात्र त्याला एक मित्र समजत होती.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*क्रमशः*