Friday, December 7, 2018

*💔घटस्फोट💔*
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

           घटस्फोट ऐकायला थोड विचित्र वाटत ना.. पण आजकाल घटस्फोट म्हणजे एक प्रकारचं fad झालं आहे. पत्त्याचं घर मोडाव तस आजकाल संसार मोडली जात आहेत. त्याचचं छोटसं उदाहरण...
          सकाळचे नऊ वाजले तरी अजुन आवरलं नव्हत. तो मात्र तसाचं विचार करत बसला होता आणि ती ची खुप चिडचिड होत होती. आज कोर्टात जायचं होत. का तर घटस्फोटासाठी... तिला हवा होता... वेगळं व्हायचं होत तिला. कुणीतरी गरम तेल कानात ओतावं तशी त्याची अवस्था झाली होती. तीचं कारण कायं तर *"माझं तुझ्याशी पटतं नाही म्हणुन*" दोघही आपापल्या मार्गाने कोर्टाच्या दिशेने चालु लागले.
          दोन वर्ष झाली होती लग्नाला. मस्त राजा-राणी सारखा संसार चालु होता. पण हल्लीच तिची चिडचिड जरा जास्त वाढली होती. तसं म्हणायला गेलं तर दोघही चांगल्या पगारावर काम करत होते. पण माणुस पैसाच्या पाठीमागे धावु लागला की एकमेंकासाठी वेळ द्यायला त्याच्याकडे वेळ नसतो. तसचं काहीस ह्यांच्यामध्ये झालं होतं. बॉसची कटकट, घरची कटकट ह्या सगळ्यांमुळे तिची दिवसेंदिवस चिडचिड वाढत होती. तो मात्र शांत झाला होता. बोलणार तरी काय तो. अस म्हणतात बायकोसमोर नवर्याच काही चालतं का काही. तो ही ह्या गोष्टीला अपवाद होता. तो मुकाटपणे सगळं ऐकुन घेत होता, ती मात्र शब्दांवर शब्द वाढवतं होती.
          आज मात्र तिच्या वागण्याला मर्यादा राहीली नव्हती. सुट्टीचा वार असल्यामुळे दोघेही घरीच होते. सगळं कामकाज अगदी उशीरा हळुवार चाललं होतं. तो fresh होऊन tv बघत बसला होता आणि हिची काम करुन हालत बेकार झाली होती. तो मदत करायला गेला तर तिला आवडत नसे. म्हणे मला माझ्या कामामध्ये लुडबुड केलेली आवडत नाही. म्हणुन तो आपला शांत tv बघत बसला होता. झाल! तिच्या डोक्याचा पारा पुन्हा एकदा चढला. तिची बडबड सुरु झाली. तो बिचारा आपला ऐकुन घेत होता. आज जरा जास्तच राग दिसत होता तिचा. आता मात्र त्याचा नाईलाज झाला. त्याचं डोकं फिरलं आणि त्याने ही राग व्यक्त केला. जे नको व्हायला ते झालं. त्याने रागात तिच्या कानाखाली मारली. हाताची चांगली पाच बोटे उठली होती. तिने रडत रडत रागात वेगळं व्हायचा निर्णय घेतला. तोही कंटाळला होता सगळ्याला. तो ही तयार झाला. दोघांचेही कोर्टाच्या दिशेने वळले.
           आज तारीख होती कोर्टाची. दोघंही समोरासमोर कोर्टाच्या पिंजर्यात बसले होते. दोघांच्याही नजरा खाली बघत होत्या. अपराधी असल्यासारख्या भावना दोघांच्याही मनात येत होत्या. आज सगळं क्षणार्धात संपणार होतं. अलगद तिच्या डोळ्यांतुन अश्रु बाहेर पडत होते. तो आजंही तसाचं गप्प बसला होता. स्वतःला मनातल्या मनात प्रश्न विचारत. त्याला आपण कुठेतरी कमी पडलो याची जाणीव होऊ लागली. तसचं तिच्या ही मनात प्रश्नांचा काहुर तयार झाला होता. आपण नकळत का होईना खुप चिडचिड केली होती याची तिला ही जाणीव होत होती. पण आता पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नव्हता. आज पेनही हस्ताक्षर करायला तयार नव्हतं पण करणं भाग होतं.
          आता ह्यात चुकी कुणाची? त्याची की तिची? मी तर म्हणतो चुकी आहे ती दोघांचीही. दोघांपैकी एकाने तरी कमीपणा घ्यायला हवा होता. का नाही घेतला गेला तो? का तर हा 👉🏻मी👈🏻 पणा मध्ये आला. जर तोच जर स्वतःच मी पणा (ego) कमी केला असता तर आज वेगळं होण्याची वेळ आली नसती. थोडक्यात काय तर रबर ताणला गेला तर एका बाजुने सैल सोडावा लागतो नाहीतर रबर तुटायला वेळ लागत नाही. तसच ह्याचं झाल होत. शेवटी काय तर *नात्यात अडकणं खुप सोप्प असत पण नात टिकवणं खुप कठीण असतं*
           खरचं आज विचार करण्यासाठी गोष्ट आहे. घटस्फोट घेण्याआधी समोरच्याचा विचार करायला हवा. जर त्याने तिचा आणि तिने त्याचा विचार केला तर नक्कीच घटस्फोट घेण्याची वेळ येणारा नाही. घटस्फोट घ्यायचा असेल तर लग्न न केलेल बरं. घटस्फोट एकमेंकाच न पटणे, हुंडा, भांडण,अपुर प्रेम, इतर काही या कारणांमुळे शक्यतो होतो. पण कुठेतरी हे थांबल पाहीजे. आणि कधीतरी हे नक्कीच थांबेल..बाकी विचार करणं तुमच्यावर आहे.

*------------ समाप्त ------------*

No comments:

Post a Comment