Saturday, December 15, 2018

☕ चहा आणि बिस्कीट 💝
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
📧 - smrbhojane@gmail.com

           सकाळचे आठ वाजले होते.सुट्टीचा वार होता आज. कोवळ्या ऊन्हामध्ये तो मस्त बालकनीमध्ये चहाचे भुरके मारत बसला होता. कुठुन तरी सुर्यकिरणांचा कवडसा डोकावुन पाहत होता. मध्येच चहामध्ये बिस्कीट बुडवुन आस्वाद घेत होता. बिस्कीट त्याला जसं आवडत होत तसचं तिला ही आवडत होत. साहजिकच तिची आठवण आली त्याला.
           तीच ती त्याच्या आयुष्यातली प्रेयसी. थोडक्यात काय तर त्याच्या चहामधली बिस्कीटवाली. नटखट आणि सुंदर. मस्त चाललं होत त्याचं. तो तिचा आणि ती त्याची. फिरायचं म्हटलं तरी दोघं एकत्र असणारच. एकमेंकासोबत जास्त वेळ spend करणारे. Made for each other म्हणायला काही हरकत नाही. पण म्हणतात ना सुख आली की दुःख ही पाठ धरुन असतातच तसचं काहीस घडणार होत.
           लग्न ठरलं होत तिच. शेवटची भेट म्हणुन त्याला भेटायला आली होती ती. आज ती अलगद त्याने हात तिचा हातात घेतला होता. थोड्या दिवसानी हेच हात मेहंदीने रंगणार होते. परिस्थिती आज दोघांच्या विरुद्ध होती. एकत्र बसले असले तरी मनाने हळुहळु लांब जाणार होते. "तुझ्याशिवाय राहु शकत नाही रे" ती त्याच्या जवळ रडुन बोलत होती. तो मात्र तिला धीर देऊन पुर्णपणे खचला होता. कर्तव्यदर्शी आई वडीलांचा मान ठेऊन लग्न कर अस तोच म्हणाला होता. ह्या जन्मी नाही निदान पुढच्या जन्मी भेट होईल आपली असे तो तिला बोलला होता. ती मात्र हुंदके देत होती. आता त्या दोघांची परिस्थिती वेगळी होती. मैत्रीचा हा हात असाच असुदे असं वचन देऊन दोघांनी ही निरोप घेतला.
           कर्तव्यदर्शी आई वडीलांचा मान ठेवुन दोघंही वेगळे झाले खरे पण मन मात्र वेगळं व्हायला तयार नव्हतं. थोडक्यात काय तर compramise करावं लागलं होत. कर्तव्य आणि तडजोड ह्या दोन्ही गोष्टी बघाव्या लागणार होत्या.
            तितक्यात दारावरच्या बेलचा आवाज आला. तो भानावर आला. बिस्कीट विरघळुन चहाच्या तळाशी गेलं होत. तशाच तिच्या आठवणी ही बिस्कीटसारख्या विरघळुन मनाच्या तळाशी खोलवर गेल्या होत्या. आज दोघही आपापल्या वाटेने पुढे गेले होते. पण आजही ती बिस्कीटवाली त्याच्या सोबत सकाळी गोड आठवणी घेऊन त्याला भेटायला येते. त्याची गरमागरम चहा आणि ती त्याची गोड बिस्कीटवाली.

✍🏻पहाटेच्या त्या रम्य सकाळी
कोमल सुर्य किरणांच्या वेळी
आठवुन जाई गोड ओळी
बिस्कीटवाली अन् धुंद वेळी❣

--------- समाप्त -----------

No comments:

Post a Comment