Tuesday, November 20, 2018

*💝 थोडं विचार करुन तर बघुया 💝*
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

          ती म्हटलं की साहजिकच तिच्या स्त्रित्वाकडे बघितलं जातंं. पण ती कधी परिपुर्ण आहे की अपुर्ण आहे याचा कधी विचार केला आहे का? चला, थोडं विचार करुन तर बघुया...
          ती म्हटलं की साहजिकच निर्माण होतात त्या अटी, मर्यादा, संशय, आशा, आकांशा आणि अपेक्षा. या पलीकडे पण तीचं अस्तित्व आहे हे आपण विसरुनच जातो. जसं की या भुतलावर पुरुष आहे तस तीच ही अस्तित्व आहेचं. याचं अस्तित्वाचा थोडं विचार करुन तर बघुया....
          वंशाला दिवा पाहिजे पण तिच्या रुपाने पणती नको. का तरं, ती आली की निर्माण होतात त्या अडचणी. पण ती जर जन्माला आली नसती तर ही सृष्टी पुर्ण झालीच नसती. मी तर म्हणतो, तेजस्वी पणती एकदा उजळु तर द्या. त्याच तेजस्वी पणतीच्या प्रकाशमय उजेडाप्रमाणे थोडं विचार करुन तर बघुया....
          जन्मदाती ही आईच. ती आई होण्याआधी एक मुलगीच असते ना. कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थी पणे ती तिची ममता देते. जगात कुणालाच द्येचा पाझर फुटणार नाही पण या आईच्या ममतेला नक्की पाझर फुटतो. मग त्याच आईच्या ममतेचा थोडं विचार करुन तर बघुया....
           भाऊबीज आणि रक्षाबंधन म्हटलं की भावाप्रमाणे तिचा ही महत्वाचा सहभाग हा असतोच. तीच ती लाडकी बहीण. भावाला चिडवणारी पण वेळेला पाठीशी खंबीर उभी राहणारी. याच वेड्या खोडकर बहिणीचा थोडा विचार करुन तर बघुया....
          कॉलेज म्हटलं की अर्थातच येते ती मैत्रीण. हक्काने मैत्रीचा हात पुढे करणारी. परिणामी, वेळेला आपल्याला मदत करणारी. वेळेला आपली बाजु मांडणारी. त्याच मैत्रीखातीरं थोडा विचार करुन तर बघुया.....
          गोंडस आणि समजुतदार अशी ती आणि आपल्या आयुष्यातील मुख्य भुमिका गाजवणारी ती म्हणजेच बायको. आपल्या संसाराची गाडी कुठेही थांबु न देता आयुष्यभर आपल्या सोबत साथ देते. थोडक्यात काय तर, मनापासुन आपल्यावर प्रेम करणारी. त्याचं खर्या खुर्या प्रेमाचा थोडा विचार करुन तर बघुया.....
           तिची रुपे अनेक आहेत. पण आपण कधी त्या गोष्टीचा विचार करत नाही. थोडा कमीपणा घेऊन आपण तिचा थोडा विचार करुन तर बघुया. जास्त नाही थोडं करायचं आहे पण खुप मोठ बनायचं आहे. संधी आहे त्याच सोनं करुन बघुया...

*--------------समाप्त-------------*

No comments:

Post a Comment