Monday, November 12, 2018

💑 *लग्नानंतर बरचं काही...*💑
✍🏻 *लेखक - समीर दि.भोजने*
📲 *8975672933*
📧 *smrbhojane@gmail.com*
          असं म्हणतात की, लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. नवीन संसाराची सुरवात... पण नवीन संसारासोबत निर्माण होतात त्या अटी आणि मर्यादा. कधी त्या अटींचा आणि मर्यांदाचा विचारासोबत तिचा विचार केला आहे का आपण? लग्नानंतर बरचं काही बदलत.....
          एक मुलगी ही बापाची अमानत असते. इतके वर्षे सांभाळुन तो त्याची सोन्यासारखी अमानत एका परक्या घरी सोपवतो. पण तीच अमानत जेव्हा एखादा विनाशाकडे नेतो तेव्हा त्या गोष्टीचा कुणी विचार करत नाही. मुलगीच लग्न होऊन जेव्हा सासरी जाते तेव्हा सगळी माणसं तिच्यासाठी नवीन असतात अगदी तिचा नवरा सुध्दा. समजुन घेणारं जवळच कोणीच नसतं. पण अशा परिस्थितीत ती स्वतःला त्यांच्यात adjust करते. पण घरातले मात्र अपेक्षांच्या डोंगराखाली तिला दाबुन टाकतात. मी असं म्हणत नाही की, सगळ्या घरात असचं चालतयं पण 100% पैकी 75% घरामध्ये सध्या हेच चालत आहे.
          कधी आपण तिच्या मनाचा विचार केलाय का? मी तर म्हणतो, तिला स्वतःच्या घराशी adjust व्हायला तिला 5 ते 6 वर्ष द्या. 5 ते 6 वर्ष नाही निदान 3 ते 4 वर्ष तरी द्या. ति एक मुलगी आहे यंत्र नाही लगेच सगळं शिकायला. आई, वडील, भाऊ, बहीण या सगळ्यांना सोडून ती एका नवीन दुनियेत आलेली असते. तरी सुध्दा ती सगळं विसरुन स्वतःला लवकरात लवकर adjust करायला बघते. शेवटी तिची जिद्द असते ती. तरी नशीब आता हुंडा पध्दत बंद झालेली आहे. नाहीतर त्यावरुन परत तिचा छळ. तसं म्हटलं तर अजुन काही ठिकाणी हुंडा पध्दत चालु आहे. हुंडा योग्य तसा भेटला नाही की तिचा सासरी छळ चालु होतो थोडक्यात म्हणायला गेलं तर सासुरवास.
           कधी आपण तिच्या मनाचा विचार केला का, तिला काय वाटत असेल. त्या ठिकाणी आपली बहीण असती तर काय केल असत? मग ती पण कुणाची तरी बहीण, मुलगी आहेच की. द्या ना तिला थोडी सुट. मग बघा कशी तुमच्या कुंटुबाशी लवकरात लवकर adjust होते. कधी तरी तिला बोला, आज तु नको मी करतो काम, तु आराम कर जरा... कधी तरी तिला बोला, आज फिरायला जाऊ.... कधी तरी तिला बोला, चल आज तुझ्या मित्र-मैत्रिणींना भेटु.... कधी तरी तिला बोला, आज बाहेर जेवायला जाऊ.... हे सगळं बोलुन तर बघा मग ती ही आनंदी होईल. संसार म्हटल की वाद-विवाद हे आलेच पण टोकाला जाऊन निर्णय घेणे हा त्याच्यावर उपाय नाही. भांडण ही शांत बसुन सोडवता येतात.
           संसारात संशय नावाचं भुत आला की संसाराची वाट लागायला वेळ लागत नाही. जसे तुमचे मित्र-मैत्रिण आहेत तसे तिचे असतीलच ना.. तिला ही वाटत असेल त्यांच्याशी बोलाव. एकदा मोकळीक देऊन तर बघा. तिला ही बरं वाटेल. लग्न झालं म्हणजे मित्र-मैत्रिण तुटत नाहीत. कधीतरी तिच्या डोळ्यात डोळे घालुन तिच्याशी बोला तिला ही बरं वाटेल. कधीतरी तिला प्रेमाने समजावुन सांगा मग तीही तुम्हाला समजावुन घेईल. हे सगळं नवरा म्हणुन फक्त तुम्हीच करु शकता. एका बापाने त्याची अनमोल संपत्ती सोपवलेली असते ती कशी ठेवायची तुमच्यावर.
            रबर ताणला गेला की कुणीतरी सैलपणा घ्यावा लागतो नाहीतर तो तुटला जातो. तसचं संसारात सुध्दा कधीतरी कमीपणा घ्यावा लागतो. आपण स्वतःहुन कमीपणा घेऊन बघा. पुढच्या वेळी ती नक्की कमीपणा घेईल. तिच्याकडे बायको म्हणुन बघण्यापेक्षा सर्वस्व म्हणुन बघा. नुसतं शरीराने जवळ जाण्यासाठी तिच्या जवळ जाऊ नका. तिचा अपमान तसा करु नका. सगळं काही माझ्यासाठी तुचं आहेस हे पटवुन द्या तिला. आयुष्यातील तिची जागा तिला कळु द्या.
           हे सगळं एकदा करुन तर बघा. लग्नानंतर बरचं काही करता येतं फक्त ते वेळेवर करता आलं पाहीजे. विषय थोडा वेगळा आहे पण विचार करण्यासारखा आहे. जे सुचलं ते लिहील.

*..........................समाप्त................*

No comments:

Post a Comment