Monday, January 10, 2022

🚫 ब्रेकअप नंतर काय? 🚫

   🚫 ब्रेकअप नंतर काय? 🚫

✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  8975672933/7058167957

🅱 - sambhojane1.blogspot.com      

    

           ब्रेकअप नंतर काय? आश्चर्य वाटलं नां? वाटायलाच हवं..... थोडा वेगळा विषय आणि विचार करण्यासारखा.

           ब्रेक-अप नंतर काय तर मन उदास करून बसणे, वाईट सवय लावून घेणे, सतत दुःखी राहणे आणि नको त्या गोष्टीचा विचार करणे. पण नक्की ब्रेकअप नंतर काय? आजवर कुणाला उलगडलं नाही. ब्रेकअप म्हणजे फक्त आणि फक्त तिने किंवा त्याने धोका दिला हे समजले जाते. पण ब्रेकअप नंतर ची दुनिया खूपच वेगळी आणि सुंदर असते हे आजकालची तरूणपिढी म्हणण्यापेक्षा युवापिढी यांना अजुन कळली नाही.

           मला नाही वाटत प्रत्येक वेळेस ब्रेकअप वाईट असतो. आज अशी युवा पिढी बघायला मिळते, ज्यांना ब्रेकअप झाल्यानंतर कळतं की बाबु,शोना या पलीकडेही जग आहे. आपला जन्म फक्त तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी झालेला नाही. या पलीकडेही अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. Actually ब्रेकअप हे पोरकटपणा आणि बालिशपणा काढून खऱ्या आयुष्यात प्रॅक्टिकल जगायला शिकवते आणि जी लोकं Positive आहेत तीच लोक आपलं काय चुकलं आणि आपण अजुन कसे चांगले बनु शकतो हे बनण्याचा प्रयत्न करतात.

           खरंतर ब्रेकअप खूप सारे Life Lessons देऊन जाते. पण माझ्या मते ब्रेकअप हे एक फक्त प्रेमामध्ये होते असे नाही अशी खुप नाती आहेत जी ब्रेकअप च्या नावाखाली मोजली जाऊ शकतात. मग ते नाते मैत्रीचे असो, भावा- बहिणीचे असो, नवरा बायकोचे असो वा एका अनोळखी व्यक्तीसाठी असो. फक्त ज्याला त्याला ज्या नजरेने बघतो त्या नजरेने आपण त्याला नाव देत असतो. आपण फक्त एकच ठरवलं आहे ब्रेकअप म्हणजे प्रेमात धोका.

           वाईट वाटणं सहाजिकच आहे आपल्याला.एखाद्या व्यक्तीशी झालेलीे एवढी Attacgment तोडणे एवढं सोपं नसतं. मग त्यामध्ये काही जण कबीर सिंग होतात तर काही जण देवदास होतात. तसे पाहायला गेल्यास ब्रेकअप ही एक Ultimately शक्ती आहे मग ती तुम्ही कसे Handle करता यावर सर्व अवलंबून आहे. मग तुम्ही व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःची Life विनाशाकडे न्यायची की स्वतःमध्ये Improvement करून स्वतःला Better बनवायचं हे तुमच्या विचारसरणीवर अवलंबून. मग आपण ठरवायचं Life Collapse करायची की Life मध्ये Shining आणायची. विषय थोडा वेगळा आहे पण विचार करण्यासारखा आहे.

----------------------- समाप्त -----------------------

Tuesday, January 4, 2022

🚫 नात्यांमधील गुंता 🚫

 ✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  8975672933/7058167957

🅱 - sambhojane1.blogspot.com  

            नातं म्हटलं की आठवतात अखंड, अविरत, चिरंजीव अखेर चालत आलेली एक आयुष्याची गाडी. मग त्या आयुष्याच्या गाडीत कधी कधी छोटी मोठी वादळे येतात तर कधी विकोपाला जाणारी युद्ध सुद्धा येतात. पण याच वादळातून आणि विकोपाला जाणार्या युध्दांमधून त्यांना सामोरे कसे जायचे याचे धडेही मिळतात आणि अनुभवही.

          नाती म्हणजे माणसांचा एक मोठा सन्मान असतो जसा सन्मान तसा दर्जा त्या त्या माणसाला मिळत जातो. पण कधी कधी हीच नाती गुंतागुंतीची होऊन माणसातल्या माणुसकीवर काळिमा फासतात आणि त्यांना उद्ध्वस्त करतात. मग त्या नात्यांमधील गुंता नवरा-बायकोचा, आईवडील-मुले, गुरू-शिष्य, मित्रमंडळी, भावंड, प्रियकर-प्रेयसी वा अन्य कुठले यांचाही असू शकतो. एकमेकांशी एखादे नाते जोडले गेले किंवा जुळले गेले की आपोआप निर्माण होतात त्या अपेक्षा आणि ह्याच अपेक्षांमुळे गुंतून गेलेल्या नात्याचे रूपांतर नात्यांच्या गुंत्यामध्ये होते.

          बऱ्याच वेळा प्रियकर-प्रेयसी त्यानंतर नवरा-बायकोमध्ये रूपांतर होते. कधी कधी ही नाती निभावणं  आणि टिकवणं कठीण होऊन बसते. गुंतून गेलेल्या नात्याचे रूपांतर नात्याच्या गुंत्यामध्ये होते. मुले मोठी झाली की त्यांना पंख फुटतात आणि आई-वडिल अन् त्यांच्यामध्ये मतभिन्नता वाढत जाते. आणि त्यातूनच नात्यामधील गुंता वाढून अबोलपणाच्या आणि विभक्त कुटूंबाच्या गाठी निर्माण होतात. मग दिसू लागतात वृद्धाश्रमाच्या वाटा आणि दरवाजे.

          एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून अमूर्त गुरू-शिष्याचे नाते निर्माण केले. त्यामध्ये तो गुंतत गेला. हे नाते निभावता निभवता त्याला उजव्या हाताचा अंगठा दक्षिणा म्हणून गमावला लागला. ह्या गुरू-शिष्याच्या निर्मळ नात्यातही गुंता होताच.

          मैत्री अशी आहे की नकळत एकमेकांशी मैत्री कधी होऊन जाते कळत नाही. आपोआप त्यात गुंतत जातो. निर्माण होता छोट्यामोठ्या तोडक्या-मोडक्या अपेक्षा आणि नात्यांमधील गुंता वाढत जातो. "ही दोस्ती सुटायची नाय" बोलणं खूप सोप्प आहे पण जेव्हा ह्याच दोस्तीचा गुंता वाढत जातो तेव्हा सोडवणं तेवढेच कठीण.

           काहीही असलं अन् कसही असलं तरी "धरलं तर चावतयं, सोडलं तर पळतयं" आणि "बोटं धरायला दिल की हात धरतयं" असं आहे. माणूस असा आहे ना कुठल्या ना कुठल्या नात्यात गुंतत असतो. नात्याशिवाय जगणेच माणसाला कठीण आहे. मानवतेचे दुसरे नावच नाते होईल. जोपर्यंत हा माणूस पृथ्वीवर जिवंत राहील तोपर्यंत "नाते" ही अविरत राहील. मग ते कुठलेही नाते असो वा नात्यांमधील गुंता असो.


------------------------ S. D. Bhojane --------------------------


Monday, May 10, 2021

🚫 दोष तुझा की माझा 🚫

 🚫 दोष तुझा की माझा 🚫

✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  ८९७५६७२९३३

🅱 - sambhojane1.blogspot.com       

          आजकाल सगळीकडे कुणाला ना कुणाला ह्या ना त्या कारणांवरुन दोष दिला जातो. पण नक्की खरा कोण आणि खोटा कोण त्यावरुनच तर समजत असत ना दोष नक्की कुणाचा आहे. ह्या मुद्यावरुन लिहिण्याच कारण वेगळचं आहे. दोष तुझा की माझा ह्या गोष्टीच रहस्य अजुन तरी फारस कुणाला उलगडल नाही आणि कदाचित उलगडु पण शकत नाही. दोष तुझा की माझा याची टांगती तलवार सगळीकडे वार्यासारखी फिरत आहे. पण त्याला आलेला अनुभव जरा वेगळाच होता.

         परवाच एक बातमी ऐकली एका मुलाला बेदम मार दिला आणि त्यामध्ये त्याला जीव ही गमवावा लागला. कारण फक्त आणि फक्त प्रेमाखातर होतं. त्याच झालं तो तिला भेटण्यासाठी आला होता तिच्या सांगण्यावरुन. पण त्या दोघांना भेटताना काही लोकांनी बघितलं. दोघांना ही त्या लोकांनी पकडले आणि जाब विचारायला लागले. पण ह्या सगळ्यामध्ये जिला भेटायला आला होता तिच्या सांगण्यावरुन तिचं त्याच्यावर उलटी फिरली आणि त्याच्या विरुध्द बोलायला लागली.

         "हा मुलगा मला त्रास देतो आणि माझ्यामध्ये लागला आहे", असं ती बोलायला लागली. हे ऐकुन त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जिच्यासाठी सगळं सोडुन भेटायला आलो तिच आज त्याच्याविरुध्द बोलत होती. आधीच लोकांची मस्तके फिरली होती त्यात अजुन हे ऐकुन त्यांना अजुनच राग आला. त्या बिचार्या मुलाला बेदम चोपला. इतका चोपला की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं पण मार जास्त लागला असल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

         हा सगळा प्रकार बघता तो मुलगा आहे म्हणुन सगळं सहन केलं त्याने पण तेच मुलीच्या बाबतीत झालं असतं तर Justic च्या नावाखाली कितीतरी मेणबत्त्या पेटल्या असत्या. हा आता  माझा दोष ना त्या मुलाला आणि ना त्या मुलीला. मग नक्की ह्यात दोष कुणाचा? त्याचा की तिचा.......

         थोडा विचार करण्यासारखं आहे. जर तिने त्याचं वेळी साथ दिली असती तर एवढा प्रकार घडला नसता. प्रेम असावं पण प्रेमामध्ये साथ दोघांची असावी. दोष देणार तरी कुणाला? तिच्या सांगाण्यावरुन तिला भेटायला आलेल्या मुलाला की?.... स्वतःचा जीव वाचवुन त्याच्यावर ढकलणार्या मुलीला?... एकाला दोष दिला तर दुसरा निर्दोष होतो आणि दुसर्याला दोष दिला पहिला निर्दोष होतो. शेवटपर्यंत हाच विचार मनात राहणार की नक्की दोष तुझा की माझा...?


-------------------- S. D. Bhojane -------------------


Monday, May 3, 2021

आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.

 ✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  ८९७५६७२९३३

🅱 - sambhojane1.blogspot.com


          गर्दीच्या घोळक्यामध्ये नावाजलेला आज एकटा पडला होता. त्याचा गाजावाजा करणारी मंडळी लपुन बसली होती. पण आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.

         किती तरी लोकांनी आपली कुंटुबे उधवस्त होताना पाहीली होती. कुणाचा सखासोयरा तर कुणाचा नातलग.ज्याने त्याने गमावला होता. ह्या गर्दीमध्ये तो ही होता. तुमच्या आमच्या सारखाच. कधी काळी सगळी लोक पाठीमागे फिरत होती. पण आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता. 

         प्लॕस्टिक मध्ये गुंडाळुन त्याला खाली फेकला. जीवनाचा अंतिम प्रवास त्याच भयानक होता. सुख दुःखाच्या वेळी ठोकवणारा तो हात निखळुन खाली पडला होता. चार खांदे द्यायला सोडाच हो! चितेला अग्नी देणारा ही कोणी नव्हता. पण आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.

         बहुतेक त्याच्या घरच्यांना त्याचा विसर पडला होता. हृदयाला पिळवटुन टाकणारा हा क्षण हो ता कारण त्याचा मृतदेह घेण्यास घरच्यांनी नाकारला होता. शेवटची मायेची हाक मारणारी नाती अबोल झाली होती. एकटेपणाची चाहुल त्याला आज चांगली भासत होती. 

           रस्तावरील गर्दीमध्ये एकच चर्चा चालु होती. बहुतेक त्याला कोरोना झाला होता.

        खरचं, आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.

Tuesday, January 5, 2021

❣️ एक अनोखं नातं 📃

 ❣️ एक अनोखं नातं 📃

✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  ८९७५६७२९३३

🅱 - sambhojane1.blogspot.com


नात्याला काही नाव नसावे, तुही रे माझा मितवा

ना त्याचे काही बंधन व्हावे, तुही रे माझा मितवा...

         

         ऐकायला किती मस्त वाटतं ना! तसचं काहीस मस्त तुझ्याबाबतीत ही म्हणता येईल. मैत्रीच्या पलीकडे अन् प्रेमाच्या अलीकडे असे गुलाबजामच्या पाकासारखे हे गोड नातं. आता इथे जास्त गोडपणा नको नाहीतर तुला Dibetes होईल. Dibetes तुला आणि त्रास मला. आता तु विचारशील कसला एवढा त्रास रे? आजारपण परवडलं पण तु घालणार त्या टिपिकल मराठी भाषेतील यमक जुळणार्या कानाला धुंद लहरीसारख्या भेदुन अशा जाणार्या तुझ्या थुकरट वाणीमधुन निघणारे तुझ्या राकट शिव्या नाही परवडत. लय मोठ होतं ना रावं. 😅

          Article तसे लिहिले 4-5. म्हटलं चला आज तुझ्याबद्दल लिहाव. तसा आज काही तुझा वाढदिवस वैगेरे नाही पण तुझ्या असण्याची गोड अशी संधी मिळावी म्हणुन हे छोटसं Article खास तुझ्यासाठी. तुझी आणि माझी ओळखं होऊन 2 years पुर्ण झाले असतील. त्या 2 years मधले अर्धा वर्ष तु न बोलण्यातच घालवलास. Reason विचारलं असतां काय तर, "मी जास्त कुणाशी बोलत नाही अस कायं तरी होतं." तेव्हापासुन जी ओळख झाली ती झालीच. काय माहित तेव्हा कशी ओळख झाली पण झाली कशी तरी. 

          असं म्हणतात मैत्रीमध्ये Limit नसते कशाची. पण तु कधी Limit हा Word असतो हे जाणवुच दिलं नाहिस. थोडक्यात काय तर बिनधास्त आहेस आणि हाच बिनधास्तपणा आपल्याला लय आवडला. मी असं ऐकल आहे की बायको म्हणजेच सगळं काही असतं. पण माझ्याबाबतीत थोडं उलटचं झालयं. तुझ्यासारखी मैत्रीण आहे म्हणुन सगळं काही आहे. मग ती तु मैत्रीण असो, वा Girlfriend असो वा बहिण असो. थोडक्यात काय तर तु असाताना Girlfriend ची गरज नाही. नात्याला अशी खास उपमा देता येणार नाही. उपमा दिली तर परत त्यावरुन मला शिवी ऐकायला लागेल.

          लोकांना देवाचे आशिर्वाद लागतात. पण मला Double Dhamaka भेटलाय. देवाचे आशिर्वाद आणि तुझ्या रोजच्या शिव्या. काय करणार आता त्याची पण सवय झाले आता. पण काही असो मनात तुझ्या काही नसतं. भांडण पण खुप होतात. पण मी एक Logic बघितलं. भांडण असो नाहीतर कशावरुन ना कशावरुन अबोला असो तरी जास्तीत जास्त 4 Days बोलणं बंद. 5th Day ला Msg असतोच असतो. हे आतापर्यंतच मी बघितलेल Logic आहे हा. शेवटी म्हणतात ना नशीबाला शनीपिडा असते तशी तुझासारखी मंगळपीडा लागलेय. सांगायच एवढचं भांडण किती पण असो अबोला कितीपण असो, कोणी असेल सोबत वा नसेल ही, आपण Always असणार. 100% नाही निदान 90% तरी नक्कीच Problem दुर करेन. लिहिण्यासारखं खुप आहे पण काय आहे ना जास्त चांगलं लिहिल की माणसं बिघडतात. आता तुझा तसा बिघडायचा संबंध येत नाही का तर तु Allready  बिघडलेली आहेस.😅

          आता हे Article Post करायला आपला एखादा Selfie पण नाही. एक सांगायचं राहिल की एवढे Year झाले, माणसं भेटुन नाती घट्ट करतात. आपलं उलट आहे, अजुन आपण भेटलोच नाही. तशी एवढी गरज नाही वाटली कधी का तर आता एवढ्या शिव्या खातोय तर भेटल्यावर तर शिव्या देऊन मारशील.😅 ज्या गोष्टी कुणाला Share करता येत नाही त्या तुला करता येतात. For example... 20K घोटाळा. थोडक्यात काय तर दिलखुलास बोलु शकतो. बोलण्यावरुन आठवलं मला आतापर्यंत हे आठवत नाही मी जास्त बोल्लोय आणि तु कमी बोल्लेस. याचा उलट आहे सगळ मी बोलतो कमी आणि ऐकतोय जास्त. थोडक्यात काय तर तुझं रामायणंच जास्त ऐकायला लागतं मला. नाही ऐकल तर सुखाने जगु देणार नाहीसं तु मला.😝

           बसं खुप लिहिलं. नाही तर काय होईल माहीतेय माझी बुद्धी वाढेल. आधीच ती 0.001 मध्ये आहे. शेवट सांगायच हेच की आपल्यातलं सिक्रेट कुणाला कधीही सांगायच नाही बरं का.....

   मैत्रीपासुनचा तुझा प्रवास

   गुंतुन नेई मज ध्यास

   हात हातात होई भास

   स्वप्न नगरीतील तुझाच सहवास


✍🏻 S. D. Bhojane📃

          (0.001) 😅


------------ The End ------------

Wednesday, November 18, 2020

📃आज पुन्हा तो एकदा जागा झाला🚶🏻‍♂️

 📃आज पुन्हा तो एकदा जागा झाला🚶🏻‍♂️

✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  ८९७५६७२९३३

🅱 - sambhojane1.blogspot.com


          एकटेपण काय असतं हे असच एकदा शोधण्यासाठी तो भरलेल्या आयुष्याच्या बाजारात शोधण्यासाठी बाहेर पडला. पण या भरलेल्या कपटी आणि स्वार्थी ढिगार्यांमध्ये काय होईल हे जणु तो विसरुन गेला होता. आज पुन्हा एकदा मनावरची कंटाळवाणी शाल विस्कटवुन तो *पुन्हा आज जागा झाला होता....*

          माणुसकीच्या पिंजर्यामधला माणुसकी नावाचा पक्षी मात्र जिंवत असुनही मेला होता. पुरेसा Oxygen मिळत असुनही व्हेंटिलेटर त्याचा चालु होता. आता तुम्हीच बघा ना,

माणुसकीचा गाजाबाजा करणारे आज किती माणुसकी बाळगत आहेत. उदाहरण लांबच कशाला बघता, ह्या धाकधुकीच्या परिस्थितीमध्ये किती लोक दगावली आणि किती लोक माणुसकी विसरली. वाईट एवढचं वाटत की, माणसं दगावली कमी आणि माणुसकी जास्त विसरली. ह्या सगळ्यांचा विचार करता करता तो कधी त्या खोट्या माणुसकीच्या बाजारांतुन बाहेर पडला त्याला कळलं नाही.

          पुढे असचं चालता चालता Relation नावाचं भुत पाठलाग करत मागे आलं. Relation शब्द मुद्दाम इथे वापरला. कारण की आज ज्याचे त्याचे Status म्हणजेच दर्जा बघायलां गेल तर काही ना काही Relation च्या नावाने ओरखडलेले असते. Relation म्हटलं की ते कोणतेही असेल मग ते घरचे Relation असो नाही तर बाहेरचे असो त्यात निर्मळता किती आहे हे जणु अजुन कुणाला कळलचं नसावं. मगं त्यात येतात खापर फोडणारे In Relationship म्हणणारे. तसं बघायलं गेलं तर Relationship च्या नावाखाली फक्त आणि फक्त पोरखेळ चालु झालाय. ह्या Relationship च्या बाजारातुन बाहेर पडणं जरा त्याला जडचं गेलं.

          पुढचं बाजार म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडतीचा बाजार. प्रेम नावाचा अमृत . आता ह्याला अमृत म्हणायचं की विषाचा प्याला म्हणायचं हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून. आता साहजिकच त्यात असे ही येतील म्हणणारे मी नाही हो त्यातला किंवा त्यातली. पण मनाच्या कोपर्यात कुठे तरी सगळ्यांना हवं असणारं. पण आज बघायला गेलं प्रेमाचा बाजारु भाव मांडला गेला आहे. हा आता दोष माझा खर्या प्रेमाला अजिबात नाही. पण काही ठिकाणी खर्या प्रेमाच्या नावाखाली निव्वळ लाचखोरी चालु आहे. मग त्यात येतात नको असलेल्या अपेक्षा आणि हव्यास. ह्यापण विशाल बाजारातुन फिरता फिरता तो बाहेर पडला.

          इतर भ्रष्टाचारांच्या बाजांराप्रमाणे आपण नोकरीसाठी धडपडणार्या विसरुनच जातो. आज कित्येक असे तरुण बेरोजगारीच्या छताखाली तसेच उभे आहेत आणि काही जण नोकरीच्या अमिषाखाली भरकटत चालले आहेत. नोकरी नाही तर भविष्य उज्वल नाही. भविष्य नाही तर पुढचे जीवन कसे जगणार. या सगळ्यांचा विचार करुनच आजची तरुणपिढी Depression आणि आत्महत्यांसारख्या प्रकरणांना बळी पडत आहे. या सगळ्यांचा विचार करु तेवढा कमीच आहे. पण या सगळ्यांमध्ये त्याला पाहिजे असलेल एकटेपण आणि खरे पणाचं तंत्र कुठे जास्त बघायला भेटलचं नाही.

          बाजार म्हंटल की साहजिकच आपल्याला भाज्यांचा अथवा कपड्यांचा आठवणार. पण ह्यापेक्षाही असे कितीतरी बाजार या जीवनाच्या सतंरजावर मांडले जातात. फक्त आपण त्याचा विचार कधी करत नाही. म्हणुन आज त्याने ही मनावरची ती मरगळ दुर करुन जणु काही एखाद्या झाडाच्या बी ला जस नव्याने कोंब फुटाव तसचं काही मरगळ दुर करुन आज पुन्हा एकदा तो जागा झाला. त्याचप्रमाणे आज बर्याच दिवसानी पेन हातात घेऊन माझ्यामधला एक छोटासा लेखक जणु काही नव्या उमेदीकडे जाण्यासाठी आज पुन्हा एकदा जागा झाला....

------------------------- समाप्त ----------------------------

Saturday, November 30, 2019

⭕ कन्याहरण ⭕
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com

     "गर्दीत माणसांच्या माणुस जात नाही ".... मंगेश पाडगावकरांची ही कविता....
    पण आज त्यात बदल करावासा वाटतोय - "गर्दीत माणसांच्या आज ही स्त्री सुरक्षित नाही."
  सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आजकाल एकच बातमी वाचायला मिळते. ती म्हणजे "हैदराबाद मध्ये घडलेल्या एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीवर 4 राक्षसांनी सामुहिक बलात्कार केला अन् तिला जाळुन मारलं....
    माणुसकीच्या नात्याला लाज वाटावी अशी निर्घुण हत्या केली तिची. ही अवस्था बघुन अंगाचा थरकाप उडाला अन् डोळ्यात पाणी आलं. त्या बिचार्या ताईला अस जाळलं होत की तिच्या लॉकेट वरुन तिची ओळख पटली फक्त. 
   इतकी राक्षसी वृत्ती आली कुठुन? एवढा कहर केला माणुसकीचा की हा माणुस राहिला नसुन राक्षसवृत्तीचा हैवान झाला आहे. रानटी जनावरासारखी त्याची फक्त वासनेची भुक  आहे.
    तीच भुक क्षमवण्यासाठी त्याला जी कोणी स्त्री भेटेल तिचा बळी घेत आहे. मग त्यात अगदी 5 वर्षाची मुलगी असो नाहीतर 70 वर्षाची म्हातारी असो त्यांना सुध्दा त्याने सोडलं नाही अन् त्यांच्यावर सुध्दा निर्घुणपणे बलात्कार केले आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्याचं देशाचं दुर्दैव आहे की आपलाच देश अन् आपल्याच देशात आपल्या माता भगिनी आज सुरक्षित नाहीत. त्या नराधमांना पोलिस पकडतील ही... त्यांना शिक्षा पण होईलच. पण मला सांगा याने हे सगळं थांबेल? ह्याने हे सगळं बदलेल का?
     दिल्लीमधील निर्भया, कोपर्डीमधील दामिनी होती, आज हैदराबादमधली ही प्रियांका. अन् उद्या दुसर्या कुठल्या तरी ताईवर हा अमानुषपणा होईलच.... आधीही आपण रस्त्यावर शोक प्रकट केले, मेणबत्या पेटवुन निषेध केला आणि आजही आपण तेच करतोय. अन् थोडे दिलस झाले की सगळं काही विसरुन  जातो. पुरुषांमधला तो राक्षस जोपर्यंत नष्ट होत नाही आणि ती वासनेची मानसिकता कमी होत नाही तो पर्यंत हा खेळ असाच चालु राहणार आहे.
      आज बघायला गेलं तर माणुस पुढे तर जातोच पण माणुसकी सगळी हरवुन बसतोय. यापेक्षा पुर्वीच आयुष्य बरं होत निदान स्त्रिया स्वतंत्रपणे जगत तरी होत्या. कुठेतरी हे सगळं थांबायला हवंय नाहितर एके दिवशी त्याच ठिकाणी आपल्याच घरातील स्त्रिवर अशी वेळ येईल. नुसती शिक्षा देऊन उपयोग नाही तर कायदा बदलायला हवाय. नाहीतर मुलगी जन्माला नाही तर हैवान जन्माला येतील.
      पिसटलेल्या ह्या रानटी राक्षसांना पिंजर्यात न कोंडता त्यांचा सर्वनाश केला पाहीजे. तरचं ह्या राक्षसी वृत्तीचा नाश होईल. आपला देश स्वतंत्र झाला खरा पण घराघरातील प्रत्येक स्त्री अजुन स्वतंत्र झालेली नाही. ज्यादिवशी घराघरातील प्रत्येक स्त्री माता भगिनी कुणालाही न घाबरता कुठेही अन् कधीही स्वतंत्र आपलं जीवन जगु शकेल किंवा फिरु शकेल त्या दिवशी खर्या अर्थाने आपला भारत देश महासत्ता ठरेल.
   अन् तेव्हा मंगेश पाडगावाकर पुन्हा म्हणतील....
    "गर्दीत माणसांच्या स्त्री आता सुरक्षित आहे. "
  थोडक्यात एवढंच बोलेन,
      "उठ मानवा सज्ज होऊनी
      विचार नको ते ध्यानी मनी
      या जन्मी फुलु दे तेजावानी
      उमलुदे तिला फुलावाणी
      हसु दे तिला कळीवाणी "

---------------- समाप्त ------------------