✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲 ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com
गर्दीच्या घोळक्यामध्ये नावाजलेला आज एकटा पडला होता. त्याचा गाजावाजा करणारी मंडळी लपुन बसली होती. पण आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.
किती तरी लोकांनी आपली कुंटुबे उधवस्त होताना पाहीली होती. कुणाचा सखासोयरा तर कुणाचा नातलग.ज्याने त्याने गमावला होता. ह्या गर्दीमध्ये तो ही होता. तुमच्या आमच्या सारखाच. कधी काळी सगळी लोक पाठीमागे फिरत होती. पण आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.
प्लॕस्टिक मध्ये गुंडाळुन त्याला खाली फेकला. जीवनाचा अंतिम प्रवास त्याच भयानक होता. सुख दुःखाच्या वेळी ठोकवणारा तो हात निखळुन खाली पडला होता. चार खांदे द्यायला सोडाच हो! चितेला अग्नी देणारा ही कोणी नव्हता. पण आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.
बहुतेक त्याच्या घरच्यांना त्याचा विसर पडला होता. हृदयाला पिळवटुन टाकणारा हा क्षण हो ता कारण त्याचा मृतदेह घेण्यास घरच्यांनी नाकारला होता. शेवटची मायेची हाक मारणारी नाती अबोल झाली होती. एकटेपणाची चाहुल त्याला आज चांगली भासत होती.
रस्तावरील गर्दीमध्ये एकच चर्चा चालु होती. बहुतेक त्याला कोरोना झाला होता.
खरचं, आज मात्र स्मशानाच्या गादीवर तो एकटा होता.
No comments:
Post a Comment