Saturday, November 30, 2019

⭕ कन्याहरण ⭕
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com

     "गर्दीत माणसांच्या माणुस जात नाही ".... मंगेश पाडगावकरांची ही कविता....
    पण आज त्यात बदल करावासा वाटतोय - "गर्दीत माणसांच्या आज ही स्त्री सुरक्षित नाही."
  सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आजकाल एकच बातमी वाचायला मिळते. ती म्हणजे "हैदराबाद मध्ये घडलेल्या एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीवर 4 राक्षसांनी सामुहिक बलात्कार केला अन् तिला जाळुन मारलं....
    माणुसकीच्या नात्याला लाज वाटावी अशी निर्घुण हत्या केली तिची. ही अवस्था बघुन अंगाचा थरकाप उडाला अन् डोळ्यात पाणी आलं. त्या बिचार्या ताईला अस जाळलं होत की तिच्या लॉकेट वरुन तिची ओळख पटली फक्त. 
   इतकी राक्षसी वृत्ती आली कुठुन? एवढा कहर केला माणुसकीचा की हा माणुस राहिला नसुन राक्षसवृत्तीचा हैवान झाला आहे. रानटी जनावरासारखी त्याची फक्त वासनेची भुक  आहे.
    तीच भुक क्षमवण्यासाठी त्याला जी कोणी स्त्री भेटेल तिचा बळी घेत आहे. मग त्यात अगदी 5 वर्षाची मुलगी असो नाहीतर 70 वर्षाची म्हातारी असो त्यांना सुध्दा त्याने सोडलं नाही अन् त्यांच्यावर सुध्दा निर्घुणपणे बलात्कार केले आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्याचं देशाचं दुर्दैव आहे की आपलाच देश अन् आपल्याच देशात आपल्या माता भगिनी आज सुरक्षित नाहीत. त्या नराधमांना पोलिस पकडतील ही... त्यांना शिक्षा पण होईलच. पण मला सांगा याने हे सगळं थांबेल? ह्याने हे सगळं बदलेल का?
     दिल्लीमधील निर्भया, कोपर्डीमधील दामिनी होती, आज हैदराबादमधली ही प्रियांका. अन् उद्या दुसर्या कुठल्या तरी ताईवर हा अमानुषपणा होईलच.... आधीही आपण रस्त्यावर शोक प्रकट केले, मेणबत्या पेटवुन निषेध केला आणि आजही आपण तेच करतोय. अन् थोडे दिलस झाले की सगळं काही विसरुन  जातो. पुरुषांमधला तो राक्षस जोपर्यंत नष्ट होत नाही आणि ती वासनेची मानसिकता कमी होत नाही तो पर्यंत हा खेळ असाच चालु राहणार आहे.
      आज बघायला गेलं तर माणुस पुढे तर जातोच पण माणुसकी सगळी हरवुन बसतोय. यापेक्षा पुर्वीच आयुष्य बरं होत निदान स्त्रिया स्वतंत्रपणे जगत तरी होत्या. कुठेतरी हे सगळं थांबायला हवंय नाहितर एके दिवशी त्याच ठिकाणी आपल्याच घरातील स्त्रिवर अशी वेळ येईल. नुसती शिक्षा देऊन उपयोग नाही तर कायदा बदलायला हवाय. नाहीतर मुलगी जन्माला नाही तर हैवान जन्माला येतील.
      पिसटलेल्या ह्या रानटी राक्षसांना पिंजर्यात न कोंडता त्यांचा सर्वनाश केला पाहीजे. तरचं ह्या राक्षसी वृत्तीचा नाश होईल. आपला देश स्वतंत्र झाला खरा पण घराघरातील प्रत्येक स्त्री अजुन स्वतंत्र झालेली नाही. ज्यादिवशी घराघरातील प्रत्येक स्त्री माता भगिनी कुणालाही न घाबरता कुठेही अन् कधीही स्वतंत्र आपलं जीवन जगु शकेल किंवा फिरु शकेल त्या दिवशी खर्या अर्थाने आपला भारत देश महासत्ता ठरेल.
   अन् तेव्हा मंगेश पाडगावाकर पुन्हा म्हणतील....
    "गर्दीत माणसांच्या स्त्री आता सुरक्षित आहे. "
  थोडक्यात एवढंच बोलेन,
      "उठ मानवा सज्ज होऊनी
      विचार नको ते ध्यानी मनी
      या जन्मी फुलु दे तेजावानी
      उमलुदे तिला फुलावाणी
      हसु दे तिला कळीवाणी "

---------------- समाप्त ------------------

No comments:

Post a Comment