🚫 दोष तुझा की माझा 🚫
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲 ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com
आजकाल सगळीकडे कुणाला ना कुणाला ह्या ना त्या कारणांवरुन दोष दिला जातो. पण नक्की खरा कोण आणि खोटा कोण त्यावरुनच तर समजत असत ना दोष नक्की कुणाचा आहे. ह्या मुद्यावरुन लिहिण्याच कारण वेगळचं आहे. दोष तुझा की माझा ह्या गोष्टीच रहस्य अजुन तरी फारस कुणाला उलगडल नाही आणि कदाचित उलगडु पण शकत नाही. दोष तुझा की माझा याची टांगती तलवार सगळीकडे वार्यासारखी फिरत आहे. पण त्याला आलेला अनुभव जरा वेगळाच होता.
परवाच एक बातमी ऐकली एका मुलाला बेदम मार दिला आणि त्यामध्ये त्याला जीव ही गमवावा लागला. कारण फक्त आणि फक्त प्रेमाखातर होतं. त्याच झालं तो तिला भेटण्यासाठी आला होता तिच्या सांगण्यावरुन. पण त्या दोघांना भेटताना काही लोकांनी बघितलं. दोघांना ही त्या लोकांनी पकडले आणि जाब विचारायला लागले. पण ह्या सगळ्यामध्ये जिला भेटायला आला होता तिच्या सांगण्यावरुन तिचं त्याच्यावर उलटी फिरली आणि त्याच्या विरुध्द बोलायला लागली.
"हा मुलगा मला त्रास देतो आणि माझ्यामध्ये लागला आहे", असं ती बोलायला लागली. हे ऐकुन त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जिच्यासाठी सगळं सोडुन भेटायला आलो तिच आज त्याच्याविरुध्द बोलत होती. आधीच लोकांची मस्तके फिरली होती त्यात अजुन हे ऐकुन त्यांना अजुनच राग आला. त्या बिचार्या मुलाला बेदम चोपला. इतका चोपला की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं पण मार जास्त लागला असल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.
हा सगळा प्रकार बघता तो मुलगा आहे म्हणुन सगळं सहन केलं त्याने पण तेच मुलीच्या बाबतीत झालं असतं तर Justic च्या नावाखाली कितीतरी मेणबत्त्या पेटल्या असत्या. हा आता माझा दोष ना त्या मुलाला आणि ना त्या मुलीला. मग नक्की ह्यात दोष कुणाचा? त्याचा की तिचा.......
थोडा विचार करण्यासारखं आहे. जर तिने त्याचं वेळी साथ दिली असती तर एवढा प्रकार घडला नसता. प्रेम असावं पण प्रेमामध्ये साथ दोघांची असावी. दोष देणार तरी कुणाला? तिच्या सांगाण्यावरुन तिला भेटायला आलेल्या मुलाला की?.... स्वतःचा जीव वाचवुन त्याच्यावर ढकलणार्या मुलीला?... एकाला दोष दिला तर दुसरा निर्दोष होतो आणि दुसर्याला दोष दिला पहिला निर्दोष होतो. शेवटपर्यंत हाच विचार मनात राहणार की नक्की दोष तुझा की माझा...?
-------------------- S. D. Bhojane -------------------