Saturday, November 30, 2019

⭕ कन्याहरण ⭕
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com

     "गर्दीत माणसांच्या माणुस जात नाही ".... मंगेश पाडगावकरांची ही कविता....
    पण आज त्यात बदल करावासा वाटतोय - "गर्दीत माणसांच्या आज ही स्त्री सुरक्षित नाही."
  सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आजकाल एकच बातमी वाचायला मिळते. ती म्हणजे "हैदराबाद मध्ये घडलेल्या एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीवर 4 राक्षसांनी सामुहिक बलात्कार केला अन् तिला जाळुन मारलं....
    माणुसकीच्या नात्याला लाज वाटावी अशी निर्घुण हत्या केली तिची. ही अवस्था बघुन अंगाचा थरकाप उडाला अन् डोळ्यात पाणी आलं. त्या बिचार्या ताईला अस जाळलं होत की तिच्या लॉकेट वरुन तिची ओळख पटली फक्त. 
   इतकी राक्षसी वृत्ती आली कुठुन? एवढा कहर केला माणुसकीचा की हा माणुस राहिला नसुन राक्षसवृत्तीचा हैवान झाला आहे. रानटी जनावरासारखी त्याची फक्त वासनेची भुक  आहे.
    तीच भुक क्षमवण्यासाठी त्याला जी कोणी स्त्री भेटेल तिचा बळी घेत आहे. मग त्यात अगदी 5 वर्षाची मुलगी असो नाहीतर 70 वर्षाची म्हातारी असो त्यांना सुध्दा त्याने सोडलं नाही अन् त्यांच्यावर सुध्दा निर्घुणपणे बलात्कार केले आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्याचं देशाचं दुर्दैव आहे की आपलाच देश अन् आपल्याच देशात आपल्या माता भगिनी आज सुरक्षित नाहीत. त्या नराधमांना पोलिस पकडतील ही... त्यांना शिक्षा पण होईलच. पण मला सांगा याने हे सगळं थांबेल? ह्याने हे सगळं बदलेल का?
     दिल्लीमधील निर्भया, कोपर्डीमधील दामिनी होती, आज हैदराबादमधली ही प्रियांका. अन् उद्या दुसर्या कुठल्या तरी ताईवर हा अमानुषपणा होईलच.... आधीही आपण रस्त्यावर शोक प्रकट केले, मेणबत्या पेटवुन निषेध केला आणि आजही आपण तेच करतोय. अन् थोडे दिलस झाले की सगळं काही विसरुन  जातो. पुरुषांमधला तो राक्षस जोपर्यंत नष्ट होत नाही आणि ती वासनेची मानसिकता कमी होत नाही तो पर्यंत हा खेळ असाच चालु राहणार आहे.
      आज बघायला गेलं तर माणुस पुढे तर जातोच पण माणुसकी सगळी हरवुन बसतोय. यापेक्षा पुर्वीच आयुष्य बरं होत निदान स्त्रिया स्वतंत्रपणे जगत तरी होत्या. कुठेतरी हे सगळं थांबायला हवंय नाहितर एके दिवशी त्याच ठिकाणी आपल्याच घरातील स्त्रिवर अशी वेळ येईल. नुसती शिक्षा देऊन उपयोग नाही तर कायदा बदलायला हवाय. नाहीतर मुलगी जन्माला नाही तर हैवान जन्माला येतील.
      पिसटलेल्या ह्या रानटी राक्षसांना पिंजर्यात न कोंडता त्यांचा सर्वनाश केला पाहीजे. तरचं ह्या राक्षसी वृत्तीचा नाश होईल. आपला देश स्वतंत्र झाला खरा पण घराघरातील प्रत्येक स्त्री अजुन स्वतंत्र झालेली नाही. ज्यादिवशी घराघरातील प्रत्येक स्त्री माता भगिनी कुणालाही न घाबरता कुठेही अन् कधीही स्वतंत्र आपलं जीवन जगु शकेल किंवा फिरु शकेल त्या दिवशी खर्या अर्थाने आपला भारत देश महासत्ता ठरेल.
   अन् तेव्हा मंगेश पाडगावाकर पुन्हा म्हणतील....
    "गर्दीत माणसांच्या स्त्री आता सुरक्षित आहे. "
  थोडक्यात एवढंच बोलेन,
      "उठ मानवा सज्ज होऊनी
      विचार नको ते ध्यानी मनी
      या जन्मी फुलु दे तेजावानी
      उमलुदे तिला फुलावाणी
      हसु दे तिला कळीवाणी "

---------------- समाप्त ------------------

Sunday, April 28, 2019

✍🏻प्रेम काय ते असतं
एकदा माझ्यावर करुन तर बघ....

सोबत कशी ती असते
एकदा माझा हात धरुन तर बघ....

विरह काय तो असतो
एकदा माझ्यापासुन लांब जाऊन तर बघ....

सुख काय ते असते
एकदा माझ्या कुशीत येऊन तर बघ....

रागावन ते काय असत
एकदा माझ्यावर रागावुन तर बघ....

प्रतिक्षा ती काय असते
एकदा माझी ती करुन तर बघ...

............ ✍🏻 ............
S. D. Bhojane

Thursday, March 7, 2019

Happy Women's Day

आजही जगात तेच चालतंय
मुलगा हवा पण मुलगी नको असते ॥धृ॥

सात महिने पोटात वाढवून
सांभाळणारी आई ही मुलगीच असते,
स्वतः उपाशी राहून सुद्धा पोटभर
जेवण ती आपल्याला देते.
पण आम्ही काय करणार, आई हवी पण मुलगी नको असते ॥१॥

रक्शाबंधनाला राखी बांधणारी ही
बहीण सुद्धा एक मुलगी असते,
पाठवणीच्या वेळेला हक्काने खांद्यावर
डोके ठेऊन रडणारी ती छकुली असते.
पण आम्ही काय करणार, बहीण हवी पण मुलगी नको असते ॥२॥

शाळेमध्ये स्वतःहून आपल्याशी बोलणारी
मैत्रीण ही सुद्धा एक मुलगीच असते.
लपुन का होईना आपल्यासाठी गुपचुप
चॅाकलेट ती बॅग मध्ये ठेवते.
पण आम्ही काय करणार, मैत्रीण हवी पण मुलगी नको असते ॥३॥

कॅालेजमध्ये प्रेम करणारी ही
प्रेयसी सुद्धा एक मुलगी असते,
Valentine Day  ला सर्वात आधी
Prapose  करणारी ती वेडी असते.
पण आम्ही काय करणार, प्रेयसी हवी पण मुलगी नको असते ॥४॥

आईवडील, घरदार सोडून येणारी
बायको सुद्धा एक मुलगी असते,
सात जन्म हाच नवरा हवा
अस म्हणणारी ती सौभाग्यवती असते.
पण आम्ही काय करणार, बायको हवी पण मुलगी नको असते ॥५॥

म्हातारपणी साथ देणारी म्हातारी
ती सुद्धा एक मुलगी असते,
मरेपर्यंत तुच जवळ हवास
असे वचन तिला हवे असते.
पण आम्ही काय करणार, आजी हवी पण मुलगी नको असते ॥६॥

     ----- समीर भोजने -----
     Happy Women's Day

Monday, February 11, 2019

📱मोबाईल - एक व्यसन📱
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने
📲  ८९७५६७२९३३
🅱- sambhojane1.blogspot.com

          स्मार्टफोन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते मोठ्या किंमतीचे आणि आकर्षक असे मोबाईल. अत्यंत स्वस्तात आणि जलद इंटरनेटमुळे कामांना गती यायला हवी होती. लोकांना एकमेंकाशी जोडले जायला हवे होते पण या उद्देशाने त्याचा वापर फार कमी प्रमाणात होतो. माणसांना माणसाशी जोडण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त असणारे हे मोबाईल आणि इंटरनेट हे दुर्दैवाने एक व्यसन बनले आहे. मानसिकतेबरोबर शारीरिक आजारही बनत चालला आहे. जसे मोठ्या माणसांनी हे व्यसन जडुन घेतले आहे तसेच लहान मुलांच्या मनालाही निराशेने ग्रासुन त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले आहे.
          जशा प्रकारे मोठी माणसं आपल्या मोबाईलशिवाय एक मिनीट राहु शकत नाहीत तसचं काहीस लहान मुलांच्या बाबतीतही घडु लागले आहे. आजकाल बघायला गेलं असता मोबाईलसाठी हीच लहान मुले काहीही करायला तयार आहेत, अगदी जीवन संपवायला सुध्दा तयार आहेत. अशाच आपल्या निरागस आणि सोजवळ लहान मुलांना आपण असं हकनाक मरु द्यायचे का? असा विचार प्रत्येक घरातील पालकांनी केला पाहिजे.
          उदाहरण द्यायचे म्हटले तर आईनं मोबाईल गेम खेळायला दिला नाही या कारणाने 2013 मध्ये एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली. एवढ्याशा छोट्याशा कारणामुळे आत्महत्या करावी लागली ही गोष्ट समजणे जरा अवघडच. खरंतर त्याचवेळी स्मार्टफोनमुळे येणार्या संकटाची चाहुल लागली होती, पण चर्चा करण्यापलीकडे काहीच झाले नाही. "आपला तो बाब्या, दुसर्याच ते कार्ट " अशा प्रकारची समजुत ठेवुन बहुतेक जण वावरत आहेत. "काय ही पोरं, आमची पोरं तशी नाहीत " असा प्रत्येक जण म्हणतो, पण घरोघरी मातीच्याच चुली असल्याचे दिसुन येते.
          एका 20 वर्षीय मुलीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली तसेच एका 10 वर्षीय मुलाने पंख्याला गळफास लावुन आत्महत्या केली. कारणं काय तर आईने मोबाईलवर गाणे ऐकण्यास मनाई केली म्हणुन त्याचा राग येऊन आत्महत्या केली तसेच कुणाच्या आईने मुलगा घराबाहेर पडत नव्हता म्हणुन आईने मोबाईल काढुन घेतला त्या रागाने आत्महत्या केली. अशी अनेक प्रकारची उदाहरणे ह्या स्मार्ट फोनमुळे घडत आहेत. पण मोबाईल दिला नाही  म्हणुन पालकांशी वाद घालणारी, अबोला धरणारी मुले आज घराघरांत दिसत आहेत. घराघरांमध्ये आणि पावलोपावली रस्तोरस्ती मोबाईलच्या स्क्रिनवर नजर खिळवलेले लोक वावरत असताना दिसत आहेत. दिवसभर काम करुन घरी परतलेले आई-वडील घरातही मोबाईलला चिकटुन राहत असतील तर त्याचंच अनुकरण करुन मुले धडे गिरवत आहेत. मग त्यांना तरी गैर कसे म्हणावे.
          आजकाल मोठी माणसं इंटरनेट वरुन चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीच जास्त बघतात. तशाच प्रकारे त्याचं अनुकरण करुन ही मुले चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त बघतात. मोबाईलचा अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदु बधीर होतो, मन मरुन जाते, कोणाबद्दल आस्था उरत नाही, निराशा वाढते अशा प्रकारचे आजार उद्भवत चालले आहेत. इंटरनेटच्या दुनियतेत प्रत्येकजण अतिशहाणा झाला आहे, या अतिशहापणाची किंमत बळी देऊन भागवायची का?
            स्मार्टफोन हे एक महत्वाचे गॕजेट आहे खरं, इंटरनेट ही काळाबरोबर चालण्यासाठीची गरज आहे खरी पण याचा योग्य वापर करण्याचे धडे मात्र गिरवण्याची गरज आहे. आपल्या लहान मुलांना वाचवायचे असेल तर, आधी आपण स्वतः म्हणजे पालकांनी वाचण्यासाठी धडपडण्याची गरज आहे. गरजेनुसार फोन आणि इंटरनेट वापरणे, मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे, पुस्तके वाचणे, नाटके पाहणे इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. इंटरनेटचा वापर टाईमपास आणि खेळण्यासाठी न करता अभ्यासासाठी आणि कला शिकवण्यासाठी करता येतो हे शिकवले पाहीजे. इंटरनेट शायरी आणि स्टेटस् बघण्यापेक्षा आपल्या मुलांची, मित्र-मैत्रिणींची, जोडीदारांची मने जाणुन घेतली पाहिजेत. तरचं आपल्या चिमुकल्यांचा बळी जाण्यापासुन थांबवु शकता आणि नक्कीच ह्यामध्ये एक ना एक दिवस बदल घडुन येईल. नाहीतर एक दिवस असा येईल की, माणसाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मोबाईल आणि इंटरनेट यांची मुलभुत गरजांमध्ये वाढ होईल.

--------------------- समाप्त ---------------------
              ❣S. D. Bhojane❣

Tuesday, January 8, 2019

🚫आत्महत्या🚫
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱- samebhojane1.blogspot.com

          मनुष्याने आपले आयुष्य १०० वर्षे फुलवावे आणि जीवनाचा आनंद घ्यावा असे विचार यजुर्वेदातील एका श्लोकात मांडण्यात आले आहेत ते असे.
   "पश्चेम शरदः शतम्, जीवेम शरदः शतम्, श्रुणुयाम शरदः शतम्
    प्रबवाम शरदः शतम्, अदिनाः स्थाम शरदः शतम्"
म्हणजेच आम्ही शंभर ऋतु पहावेत, आम्ही शंभर वर्षे जगावे, आम्ही शंभर वर्षे ऐकावे, आम्ही शंभर वर्षे बोलावे, आम्ही शंभर वर्षे सुदृढ रहावे.
         पण आजकाल १०० वर्षे काय साधी ५० वर्षे सुद्धा काढत नाहीत. का तर, त्याच मुळ कारण म्हणजे "आत्महत्या". जबरदस्तीने आपल्या शरीरातील असणार्या आत्म्याची हत्या करणे म्हणजेच आत्महत्या. तसे म्हणायला गेलं तर ५०% माणसाचे आयुष्य आत्महत्या या कारणामुळेच संपते. आयुष्यात उतार-चढाव हे येणारच असतात म्हणुन कधी शेवटचा निर्णय घेऊ नये. अपयशात खचु नये आणि आनंदात माजु नये. आत्महत्या ही एका व्यक्तीची समस्या नसुन समाजातील अनेक गट या प्रवृतीकडे आकर्षित होत आहेत.
          तसं म्हणायला गेलं तर कर्जबाजारी असणार्या व्यक्तीच फक्त मृत्युला कवटाळुन बसलेत असे नाही तर यामध्ये श्रीमंत व्यक्तीचा सुध्दा सहभाग आहे. म्हणुनच आत्महत्या ही व्यक्तीगत समस्या न राहता राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपाययोजना शोधुन समाजाचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.
          आत्महत्येमध्ये तसं पहायला गेलं तर व्यापारीवर्ग, पदवीधर विद्यार्थी आणि कष्टाळु-गरीब असे वर्गवारी आढळुन आल्याचे स्पष्ट होते. कोणी व्यापारी स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या करतो. कोणी विद्यार्थी    प्रेमभंगामुळे स्वतःच आयुष्य संपवतो. तर कोणी गरीब कर्जबाजारीमुळे स्वतःच आयुष्य संपवतो आणि स्वतःच्या कुंटुबाला संपवायला भाग पाडतो. प्रत्येकालाच जर आपल्या आयुष्यातील समस्या "आत्महत्या" केल्यावरच संपतील असे वाटत असते. पण खरं पाहता समस्या संपत तर नाहीत पण त्याच बरोबर जो होणारा ञास असतो तो जास्त सहन करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये "शेतकर्यांच्या आत्महत्या" ही राष्ट्रीय समस्या व्हायला फार वेळ लागणार नाही.
          आयुष्य हे कधीच साधं-सोप आणि सरळ रेषेत जात नसते. आयुष्य म्हटलं की सुख-दुःख, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, ताणतणाव, बेकारी, अपयश या समस्या येतातच. सगळचं जर आपल्या मनासारखे होणार असेल तर त्याला जीवन कसं म्हणता येईल. मग मनाप्रमाणे घडलं पाहिजे हा अट्टाहास हवाच कशाला मी म्हणतो. दुःख सोसल्याशिवाय सुखाची चव कळत नाही तसेच "तळ" गाठल्याशिवाय "वर" यायला सुरुवात होत नाही.
           पण आजची पिढी एकदा तळ गाठला की आपण वर कधी येणारच नाही? या भीतीने खचुन जाते. निव्वळ अपयशाच्या भीतीपोटी केलेली आत्महत्या समजण्यापलीकडेच आहे. भौतीक सुखाच्या मागे धावता धावता पालक बालक मधला संवाद संपत चाललाय. आजचे पालक मुलाला म्हणतात, "अमुक हवे असेल तर तमुक कर" अशी अट असते. पण आपण आपल्या आई-वडिलांची अट पूर्ण करण्यात कमी पडतोय या विचारामुळेच नैराश्य मुलांमध्ये येते. आयुष्य सुरु होण्याआधीच संपवुन टाकणारे हजारो विद्यार्थीवर्ग आज या जगात वावरत आहेत.
          आजची युवापिढी कर्तव्य विसरत चाललीय, ती स्वतःचाच विचार करु लागलेत असा आरोप लावताना पालकवर्ग विवेकशक्ती हरवुन बसलेत हे म्हणायला हरकत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक मुलं "सुपरमॕन" नसते आणि प्रत्येक पालक हा सहज पुरवणारा "भांडवलदार" नसतो. आत्महत्या या एका दिवसात घडत नसतात. त्याच्या अगोदर अनेक महिने व्यक्तीच्या मनात चलबिचल चालु असते. त्याच काळात आधार देणे गरजेचे असते. आयुष्य जगण्याची उमेद देण्याची गरज असते. आणि नक्कीच एक ना एक दिवस हे आत्महत्यांचे प्रमाण थांबेल.

------------- समाप्त ------------