Wednesday, November 18, 2020

📃आज पुन्हा तो एकदा जागा झाला🚶🏻‍♂️

 📃आज पुन्हा तो एकदा जागा झाला🚶🏻‍♂️

✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  ८९७५६७२९३३

🅱 - sambhojane1.blogspot.com


          एकटेपण काय असतं हे असच एकदा शोधण्यासाठी तो भरलेल्या आयुष्याच्या बाजारात शोधण्यासाठी बाहेर पडला. पण या भरलेल्या कपटी आणि स्वार्थी ढिगार्यांमध्ये काय होईल हे जणु तो विसरुन गेला होता. आज पुन्हा एकदा मनावरची कंटाळवाणी शाल विस्कटवुन तो *पुन्हा आज जागा झाला होता....*

          माणुसकीच्या पिंजर्यामधला माणुसकी नावाचा पक्षी मात्र जिंवत असुनही मेला होता. पुरेसा Oxygen मिळत असुनही व्हेंटिलेटर त्याचा चालु होता. आता तुम्हीच बघा ना,

माणुसकीचा गाजाबाजा करणारे आज किती माणुसकी बाळगत आहेत. उदाहरण लांबच कशाला बघता, ह्या धाकधुकीच्या परिस्थितीमध्ये किती लोक दगावली आणि किती लोक माणुसकी विसरली. वाईट एवढचं वाटत की, माणसं दगावली कमी आणि माणुसकी जास्त विसरली. ह्या सगळ्यांचा विचार करता करता तो कधी त्या खोट्या माणुसकीच्या बाजारांतुन बाहेर पडला त्याला कळलं नाही.

          पुढे असचं चालता चालता Relation नावाचं भुत पाठलाग करत मागे आलं. Relation शब्द मुद्दाम इथे वापरला. कारण की आज ज्याचे त्याचे Status म्हणजेच दर्जा बघायलां गेल तर काही ना काही Relation च्या नावाने ओरखडलेले असते. Relation म्हटलं की ते कोणतेही असेल मग ते घरचे Relation असो नाही तर बाहेरचे असो त्यात निर्मळता किती आहे हे जणु अजुन कुणाला कळलचं नसावं. मगं त्यात येतात खापर फोडणारे In Relationship म्हणणारे. तसं बघायलं गेलं तर Relationship च्या नावाखाली फक्त आणि फक्त पोरखेळ चालु झालाय. ह्या Relationship च्या बाजारातुन बाहेर पडणं जरा त्याला जडचं गेलं.

          पुढचं बाजार म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडतीचा बाजार. प्रेम नावाचा अमृत . आता ह्याला अमृत म्हणायचं की विषाचा प्याला म्हणायचं हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून. आता साहजिकच त्यात असे ही येतील म्हणणारे मी नाही हो त्यातला किंवा त्यातली. पण मनाच्या कोपर्यात कुठे तरी सगळ्यांना हवं असणारं. पण आज बघायला गेलं प्रेमाचा बाजारु भाव मांडला गेला आहे. हा आता दोष माझा खर्या प्रेमाला अजिबात नाही. पण काही ठिकाणी खर्या प्रेमाच्या नावाखाली निव्वळ लाचखोरी चालु आहे. मग त्यात येतात नको असलेल्या अपेक्षा आणि हव्यास. ह्यापण विशाल बाजारातुन फिरता फिरता तो बाहेर पडला.

          इतर भ्रष्टाचारांच्या बाजांराप्रमाणे आपण नोकरीसाठी धडपडणार्या विसरुनच जातो. आज कित्येक असे तरुण बेरोजगारीच्या छताखाली तसेच उभे आहेत आणि काही जण नोकरीच्या अमिषाखाली भरकटत चालले आहेत. नोकरी नाही तर भविष्य उज्वल नाही. भविष्य नाही तर पुढचे जीवन कसे जगणार. या सगळ्यांचा विचार करुनच आजची तरुणपिढी Depression आणि आत्महत्यांसारख्या प्रकरणांना बळी पडत आहे. या सगळ्यांचा विचार करु तेवढा कमीच आहे. पण या सगळ्यांमध्ये त्याला पाहिजे असलेल एकटेपण आणि खरे पणाचं तंत्र कुठे जास्त बघायला भेटलचं नाही.

          बाजार म्हंटल की साहजिकच आपल्याला भाज्यांचा अथवा कपड्यांचा आठवणार. पण ह्यापेक्षाही असे कितीतरी बाजार या जीवनाच्या सतंरजावर मांडले जातात. फक्त आपण त्याचा विचार कधी करत नाही. म्हणुन आज त्याने ही मनावरची ती मरगळ दुर करुन जणु काही एखाद्या झाडाच्या बी ला जस नव्याने कोंब फुटाव तसचं काही मरगळ दुर करुन आज पुन्हा एकदा तो जागा झाला. त्याचप्रमाणे आज बर्याच दिवसानी पेन हातात घेऊन माझ्यामधला एक छोटासा लेखक जणु काही नव्या उमेदीकडे जाण्यासाठी आज पुन्हा एकदा जागा झाला....

------------------------- समाप्त ----------------------------